News Flash

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती

मिल्खा सिंग

करोनाशी झुंज देणारे भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. चंदीगड येथील पीजीआयएमआर (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च) रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. रुग्णालयाने आज ही माहिती दिली. मिल्खा सिंग अद्याप कृत्रिम ऑक्सिजनच्या आधारावर आहेत. तीन डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांचे परीक्षण केले जात आहे.

पीजीआयएमईआरचे प्रो. अशोक कुमार यांनी सांगितले, की करोनामुळे आजारी असलेल्या मिल्खा सिंग यांना ३ जूनपासून पीजीआयएमआरच्या एनएचई ब्लॉकच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय मापदंडाच्या आधारे कालच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती चांगली आहे.”

 

हेही वाचा – ‘‘देशाकडून खेळण्यासाठी माझ्या कातडीचा रंग योग्य नाही, असं मला सांगण्यात आलं”

शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंह यांच्या प्रकृतीबाबत अफवा समोर येत होत्या. मात्र, “या अफवांकडे दुर्लक्ष करा. या चुकीच्या बातम्या आहेत”, असे डॉक्टरांनी सांगितले. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही मिल्खा यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “कृपया या महान खेळाडू आणि भारताचा अभिमान असलेल्या मिल्खा सिंग यांच्याबद्दल खोट्या बातम्या व अफवा पसरवू नका. त्याची प्रकृती स्थिर आहे”, असे रिजिजू म्हणाले. काल शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 5:34 pm

Web Title: flying sikh mlkha singhs health is better and he is being closely monitored by a team of three doctors adn 96
Next Stories
1 ‘‘देशाकडून खेळण्यासाठी माझ्या कातडीचा रंग योग्य नाही, असं मला सांगण्यात आलं”
2 KKRला जबर धक्का..! पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार
3 पाक कर्णधार बाबर आझमची ‘बाबर की कहाणी’ होतेय जोरदार व्हायरल!
Just Now!
X