फिफा फुटबॉल विश्वचषकात रविवारी होणाऱ्या लढतींमध्ये अर्जेटिना आणि फ्रान्स हे खास आकर्षण ठरणार आहे. दोन्ही बऱ्यापैकी तुल्यबळ संघांना पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी तगडे नसल्याने सोपा विजय मिळाला आहे. त्यामुळेच सट्टाबाजारात या दोन्ही संघांबाबत कुठलीही शंका उपस्थित करण्यात आलेली नाही. अर्जेटिनाचा मोठय़ा गोलफरकाने विजय होईल, या दिशेनेही सट्टा लावण्यात आला आहे. लिओनेल मेसीबद्दल सट्टेबाजारात कमालीची उत्सुकता आहे. त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोलवर सट्टा खेळला जात आहे. मेसी पाचहून अधिक गोल करील, असा विश्वासही पंटर्सना आहे. बोस्निया हा संघ पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. त्यामुळे त्या दिशेने चमत्कार होईल असे वाटणाऱ्या सट्टेबाजांनी सहा ते दहा रुपये देऊ केले आहेत. मेस्सीपाठोपाठ फ्रान्सचा फ्रँक रिबेरी याच्याबद्दलही सट्टेबाज खूपच आशावादी आहेत. सट्टेबाजांच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील तग धरून असला तरी अर्जेंटिनाचे यंदा तगडे आव्हान असेल, असे सट्टेबाजाराला वाटत आहे. त्यामुळे एकाक्षणी ब्राझीलसोबत अर्जेटिनाला पंटर्सनी समान भाव दिला आहे.
आजचा भाव :
    स्वित्र्झलड    इक्वेडोर –
    ४० पैसै (३१/२०)    तीन रुपये (९/४)
    फ्रान्स    होंडुरास –
    ३५ पैसे (४/११)    पाच रुपये (१२/१)
    अर्जेंटिना    बोस्निया
३० पैसे (५/१२)    सहा ते दहा रुपये (१७/२)
(कंसात आंतरराष्ट्रीय भाव)
निषाद अंधेरीवाला