08 March 2021

News Flash

फुटबॉलमध्येही फिक्सिंगची वाळवी : कथित आरोपांप्रकरणी तीन खेळाडू अटकेत

क्रीडाविश्वाला असलेला गैरप्रकारांचा विळखा आणखी घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. जगात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलला फिक्सिंगची वाळवी लागली आहे.

| November 29, 2013 01:21 am

क्रीडाविश्वाला असलेला गैरप्रकारांचा विळखा आणखी घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. जगात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलला फिक्सिंगची वाळवी लागली आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील फुटबॉलचे सामने निश्चित (मॅचफिक्सिंग)  केल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी तीन खेळाडूंसह आणखी काही व्यक्तींना अटक केली आहे.
सट्टेबाजीचे रॅकेट चालवण्याचा आरोपांवरून तीन खेळाडू तसेच डेलरॉय फेसये हा माजी खेळाडू आणि आता मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. ‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार,  आशिया खंडातील काही व्यक्ती इंग्लंडमधील फुटबॉलचे सामने निश्चित करत असल्याचे उघड झाले
होते. ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हे संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘संघटनेच्या तपासाचा भाग म्हणून देशभरातून सहा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांतील संशयित बेटिंग रॅकेटचा उद्ध्वस्त करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. गॅम्बलिंग आयोग तसेच फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने हे तपासकार्य सुरू आहे. मात्र तूर्तास अधिक माहिती उघड करता येणार नाही.’’ ५० हजार युरोंसाठी हे फुटबॉलचे सामने निश्चित करण्यात येत असल्याचे एका स्टिंग-ऑपरेशनद्वारे समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:21 am

Web Title: football match fixing six arrested by police investigating betting
टॅग : Football
Next Stories
1 धवनच्या धडाक्यामुळे विजयाचे ‘शिखर’ सर
2 मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, सायलीची विजयी सलामी
3 रवी सावंत यांच्याकडे एमसीएचे प्रभारी अध्यक्षपद
Just Now!
X