News Flash

VIDEO: ‘बायसिकल किक’ आणि गोलss… रोनाल्डोवर नेटकरी झाले फिदा

हे तर अविश्वसनीय...

ख्रिस्तीयानो रोनाल्डो

काही खेळाडूंचा मैदानावरील वावरच एक प्रकारची वातावरण निर्मिती करुन जातो. अशाच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो. त्याच्या नुसत्या येण्यानेच मैदानात चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण येतं. मुख्य म्हणजे फुटबॉलचा सामना पाहायला आल्यावर रोनाल्डोला खेळताना पाहणं आणि गोलपोस्टमध्ये त्याने केलेल्या गोलचा याची देही याची डोळा आनंद घेणं म्हणजे एक सुरेख अनुभव. फक्त मैदानातच कशाला, तर टेलिव्हिजनसमोर बसलेलं असतानाही रोनाल्डोला फुटबॉल खेळताना पाहून चाहत्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. चाहत्यांचं हेच प्रेम आणि खेळावर असणारं रोनाल्डोचं प्रभुत्वं पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

ज्युवेंटस Juventus फुटबॉल क्लब आणि रिअल मद्रिद Real Madrid यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात रोनाल्डोच्या अद्वितीय खेळाची झलक पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही सध्या फक्त आणि फक्त ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या ‘त्या’च गोलची चर्चा आहे. ‘बायसिकल किक’ मारत त्याने ज्या अंदाजात बॉल थेट गोलपोस्टमध्ये पोहोचवला ते पाहता काही मिनिटांसाठी आश्चर्यचकित होत, ‘अरे हा असंही करु शकतो’, हेच म्हणायला अनेकजण भाग पडले.

सुरुवातीपासून विरोधी संघाच्या खेळाडूंनी रोनाल्डोच्या गतीला वेसण घालण्याचा प्रयत्न केला होता. तिथून ज्युवेंटस संघाच्या चाहत्यांनीसुद्धा आपल्याच संघाच्या नावाने घोषणा करत त्यांचं मनोबळ वाढवण्यास सुरुवात केली होती. पण, रोनाल्डोच्या ‘बायसिकल किक’च्या आधारे केला गेलेला तो गोल पाहून सर्वच चाहत्यांनी उभं राहून त्याला दाद दिल्याचं पाहायला मिळालं. रोनाल्डोने केलेल्या या गोलनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा या महान खेळाडूच्या लोकप्रियतेला उधाण आल्याचं पाहायला मिळालं. अनेक फुटबॉलपटूंनीही त्याच्या या अविश्वसनीय खेळाची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं. हा सलग दहावा चॅम्पियन्स लीग सामना आहे, ज्यामध्ये रोनाल्डोने आपल्या अफलातून खेळाचं प्रदर्शन केलं जो सध्याच्या घडीला एक विक्रमच ठरत आहे.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 9:32 am

Web Title: footballer cristiano ronaldos stunning bicycle kick leaves twitterati gasping for breath watch video
Next Stories
1 गंभीरच्या उत्तराला आफ्रिदीचं प्रत्युत्तर, काश्मीरवरुन गंभीर-आफ्रिदीत जुंपली
2 भारतासाठी बॉक्सिंग-बॅडमिंटनची सोपी परीक्षा!
3 एमसीएचा कारभार पाहण्यासाठी आता प्रशासक
Just Now!
X