14 October 2019

News Flash

विश्वचषकासाठी प्रत्येक संघासोबत लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी

प्रत्येक संघासोबत एक अधिकारी असेल. तो संघासोबत हॉटेलवर राहील व त्यांच्यासोबतच प्रवास करील,’’ असे ‘आयसीसी’ने सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

आगामी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० संघांसोबत स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी असेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली आहे. सराव सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी संघासोबत असेल, असे ‘डेली टेलिग्राफ’ वृत्तपत्राने म्हटले आहे.

‘‘प्रत्येक संघासोबत एक अधिकारी असेल. तो संघासोबत हॉटेलवर राहील व त्यांच्यासोबतच प्रवास करील,’’ असे ‘आयसीसी’ने सांगितले.

First Published on May 15, 2019 2:56 am

Web Title: for every world cup team anti corruption prohibition officer