झिम्बाब्वेचे माजी कर्णधार हिथ स्ट्रिक सध्या शेती आणि अभयारण्यात सफारी(मार्गदर्शक) म्हणून कामही ते करत आहेत. ऐकून जरा आश्चर्य वाटेल पण, हे खरे आहे.
झिम्बाब्वे संघातून ९०च्या दशकात ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामने खेळलेले झिम्बाब्वेचे माजी कर्णधार सध्या शेती आणि अभयारण्यातील मार्गदर्शक या व्यवसायात मग्न असतात. हिथ स्ट्रिक हे झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक होते. खेदाजी बाब म्हणजे काही आर्थिक कारणावरून झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाने स्ट्रिक यांचा कराराचे नुतनीकरण केलेच नाही. त्यामुळे स्ट्रिक यांना या व्यवसायाकडे वळावे लागले.   
३९ वर्षीय हिथ स्ट्रिक म्हणतात, “कोणाला समजले की, मी सध्या शेती आणि प्राण्यांना सांभाळण्यात माझा वेळ घालवितो तर, हे ऐकून अनेकांना आश्चर्य़ वाटते. पण, मी आता या व्यवसायात आनंदी आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे हे प्रत्येकाला जमणे गरजेचे असते.”
स्ट्रिक ज्या अभयारण्यात मार्गदर्शकाचे काम पाहतात त्या प्राणीसंग्रहालयात झेब्रा, चित्ते, हत्ती, माकडे, घोडे आणि काही विविध जातीचे पक्षी आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथूनही पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी येतात. 

For Heath Streak, a different kind of game