06 March 2021

News Flash

सर्वाधिक कमाई करणाऱया पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये एकही भारतीय नाही!

सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत अव्वल स्थानी

रोनाल्डोची कमाई तब्बल ८ कोटी ८० लाख अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.

फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत २३ देशांतील विविध खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.

सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत अव्वल स्थानी असून, त्याची कमाई तब्बल ८ कोटी ८० लाख अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. यातील ५ कोटी ६० लाख अमेरिकी डॉलर्स रोनाल्डोचे मानधन आहे, तर ३ कोटी २० लाख अमेरिकी डॉलर तो जाहिरातींच्या माध्यमातून कमावत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेसी यादीत दुसऱया स्थानावर असून, त्याची कमाई ८ कोटी १० लाख अमेरिकी डॉलरच्या घरात आहे. तिसऱया स्थानावर बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स, तर चौथ्या स्थानावर टेनिसपटू रॉजर फेडरर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 5:32 pm

Web Title: forbes highest paid athletes list cristiano ronaldo on top
Next Stories
1 सायनाची विजयी सलामी
2 भारताच्या प्रशिक्षकपदासाठी प्रसादही रिंगणात
3 Maria Sharapova Banned for two years: शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी
Just Now!
X