News Flash

भारतीय संघात परदेशी फुटबॉलपटू?

राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅच यांचे संकेत

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय फुटबॉल संघात भविष्यात भारतीय वंशाच्या परदेशातील खेळाडूंचा समावेश करणार असल्याचे संकेत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी दिले आहेत.

अलीकडेच दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात भारताला संयुक्त अरब अमिरातीकडून ०-६ असा मानहानीजनक पराभव पत्करावा लागला. ‘‘अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या प्रतिस्पर्धी संघांनी परदेशातील खेळाडूंचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे. अफगाणिस्तान संघात सध्या युरोपियन लीगमध्ये खेळत असलेले १३ खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळत आहेत. जर्मनी, पोलंड, फिनलँड, नेदरलँड्स आणि स्वीडन या देशांमध्ये ते लीग फुटबॉल खेळत आहेत,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘‘इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) चमक न दाखवलेल्या एकही खेळाडूला आम्ही संधी दिली नाही. तसेच आजारपण, दुखापती आणि खराब कामगिरीमुळे आम्ही राहुल भेके, सेरिटन फर्नांडेस, आशीष राय, ब्रँडन फर्नांडेस, अब्दुल सहल, उदांता सिंग आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्यावर विसंबून राहिलो नाही. प्रत्येक खेळाडूला त्यांच्या आवडत्या ठिकाणी खेळण्याची आम्ही संधी दिली,’’ असेही स्टिमॅच यांनी स्पष्ट केले.

‘‘आता जून महिन्यात होणाऱ्या आणखी काही मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी आम्ही यापैकी नवोदित खेळाडूंना संधी देणार आहोत. मात्र तुलनेने सोप्या वाटणाऱ्या प्रतिस्पध्र्यांविरुद्ध चांगली कामगिरी करण्यापेक्षा बलाढ्य प्रतिस्पध्र्यांविरुद्ध आमचा खेळ कसा होतो, हे पाहायला मला आवडेल. एका सामन्यातील सुमार कामगिरीवरून आम्ही खेळाडूंच्या कलागुणांची पारख करणार नाहीत,’’ असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:16 am

Web Title: foreign footballers in the indian team abn 97
Next Stories
1 वेध आयपीएलचे : विदेशी चौकडीपासून सावधान!
2 मुंबईतील सामन्यांबाबत साशंकता
3 …तर काही ठिकाणचा ऑलिम्पिक ज्योत कार्यक्रम रद्द!
Just Now!
X