बांगलादेशच्या २१ वर्षीय क्रिकेटपटू मोहम्मद सोझीबने आत्महत्या केली आहे. २१ वर्षीय मोहम्मदच्या जाण्याने बांगलादेशच्या क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. २०१७ साली मोहम्मदने बांगलादेशकडून ३ वन-डे सामने खेळले होते. २०१८ साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील टी-२० विश्वचषकासाठी मोहम्मद सोझीब बांगलादेशच्या संघात राखीव खेळाडूंच्या यादीत निवड झाली होती.
स्थानिक क्रिकेटमध्ये मोहम्मद ढाका येथील शिनेपुकूर क्रिकेट क्लबकडून खेळायचा. मार्च २०१८ पासून मोहम्मदला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मोहम्मदने आत्महत्येचं पाऊल का उचललं याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. मोहम्मदच्या निधनामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही शोक व्यक्त केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 1:54 pm