06 August 2020

News Flash

माजी बॉक्सिंगपटू डिंको सिंग करोनामुक्त

यकृताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी डिंको सिंग नवी दिल्लीत दाखल झाले होते.

| July 4, 2020 02:53 am

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता माजी बॉक्सिंगपटू डिंको सिंग याची कर्करोगाशी झुंज सुरू असून गेल्या महिन्यापासून तो करोनाशी लढा देत होता. मात्र महिनाभराच्या उपचारानंतर तो करोनामुक्त झाला असून इम्फाळमधील आपल्या घरी परतला आहे.

पुढील १४ दिवस त्याला घरीच विलगीकरण करावे लागणार आहे. मे महिन्यात रुग्णालयात दाखल के ल्यानंतर पाच वेळा त्याचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. ‘‘गेला एक महिना माझ्यासाठी खडतर होता. माझ्यानंतर येणारे रुग्ण माझ्याआधी घरी परतत असतानाचे पाहून मन दु:खी व्हायचे. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतरांचे फक्त आभार मानून चालणार नाही तर त्यांनी मला दुसरे जीवदान दिले आहे,’’ असे डिंको सिंग यांनी सांगितले.

यकृताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी डिंको सिंग नवी दिल्लीत दाखल झाले होते. पण त्यांना कावीळची लागण झाल्याचे निदान झाल्यावर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया थांबवण्यात आली होती. विमानसेवा बंद असल्यामुळे डिंको सिंग यांना २४०० किलोमीटरचा प्रवास करून मणिपूरमध्ये परतावे लागले होते. या प्रवासादरम्यानच त्यांना करोनाची बाधा झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 2:53 am

Web Title: former boxer dingko singh recovers from covid 19 zws 70
Next Stories
1 २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर संशय घेण्याचं कारण नाही – आयसीसी
2 भारताने जिंकलेला World Cup फिक्स होता? श्रीलंकन पोलिसांनी दिलं उत्तर
3 २०१९ विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी संघात भीतीचं वातावरण होतं : इंझमान उल-हक
Just Now!
X