करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात चिंतेची परिस्थिती निर्माण केली आहे. या विषाणूने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा १४वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर या स्पर्धेत खेळणारे खेळाडू आणि इतर सदस्य त्यांच्या मायदेशी परतले आहे. मात्र घरी जाऊनही काही खेळाडूंनी भारताच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत धीर दिला आहे. आयपीएलमध्ये समालोचन करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने भारताच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत थेट हिंदीतून ट्वीट केले आहे.

या ट्वीटमध्ये त्याने लोकांना सावध रहाण्याचे आवाहन केले. ”मी भारत सोडला असला,  तरीही मी या देशाचा विचार करीत आहे. कारण या देशाने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. कृपया सुरक्षित राहा. ही वेळ निघून जाईल, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे.”

 

पीटरसनपूर्वी इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा (आरआर) फलंदाज जोस बटलरने भारताला भावनिक संदेश दिला. ”भारत हा एक विशेष देश आहे, जो या वेळी कठीण टप्प्यातून जात आहे. माझे आणि माझ्या कुटुंबाचे नेहमीप्रमाणे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. कृपया सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या”, असे बटलरने म्हटले होते.

भारतीयांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

 

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्याच येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.