भारताथ करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. माजी भारतीय खेळाडू रुद्रप्रताप सिंह (आर. पी. ​​सिंह) यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. आर. पी. ​​सिंहच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्याने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली.

 

आर. पी. ​​सिंहची क्रिकेट कारकीर्द

भारतीय संघाकडून आर. पी. ​​सिंहने चमकदार कामगिरी केली. तो देशाकडून तिन्ही स्वरुपात खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १४ सामन्यात ४० बळी घेतले. याशिवाय एकदिवसीय सामन्यात त्याने ५८ सामन्यांत ६९ बळी घेतले. टी-२० क्रिकेटच्या १० सामन्यात त्याने १५ बळी घेतले. आयपीएलमध्येही आर. पी. ​​सिंहने ८२ सामन्यांत ९० बळी घेतले.

भारतीय लेगस्पिनर पीयूष चावला याच्याही वडिलांना करोनामुळे जीव गमवावा लागला. महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहिण यांचेही निधन झाले. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून दमदार कामगिरी केलेला जलदगती गोलंदाज चेतन साकारियाचे वडीलही करोनामुळे जीव गमावून बसले.

 

 

भारतातील कोरोना विषाणूची स्थिती बिकट आहे आणि दररोज लाखो लोकांना संसर्ग होत आहे. आर. पी. ​​सिंहच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आकाश चोप्रा, इरफान पठाण, पार्थिव पटेल यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली आहे.