News Flash

“….त्यामुळे BCCIने धोनीला दिला होता खास फोन”

माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला खुलासा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. मागील वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीला शांत स्वभावासाठी ओळखले जाते. तो युवराज सिंग आणि हरभजन सिंग सारखा इतर खेळाडूंची थट्टा मस्करी करत नव्हता. धोनी स्वत: ला इतका एकटा ठेवायचा, की तो इतरांचा फोनही उचलत नसे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे.

धोनीला BCCIकडून खास फोन

सेहवागने क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली. सेहवाग म्हणाला, ”एकदा बीसीसीआयच्या सचिवांनी धोनीला फोन केला होता, तोही त्याने उचलला नव्हता. नंतर जेव्हा ते सचिव धोनीला भेटले, तेव्हा त्यांनी धोनीला एक वेगळा फोन दिला आणि सांगितले, की जेव्हा हा फोन वाजेल, तेव्हा तुला तो उचलावा लागेल.” सेहवागने त्या सचिवाचे नाव सांगितले नाही.

सेहवाग म्हणाला, ”धोनी कर्णधार होता त्यामुळे त्याला बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी होणे आणि फोन उचलणे गरजेचे होते. तेव्हापासून धोनीकडे तो फोन होता. आता तो फोन त्याच्याकडे आहे, का हे मला ठाऊक नाही.”

महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या चौदाव्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. आत्तापर्यंत त्याच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली आहे. आज (२५ एप्रिल) त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी वानखेडे मैदानावर रंगत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 4:25 pm

Web Title: former cricketer virender sehwag revealed that bcci gave special mobile to ms dhoni adn 96
Next Stories
1 कौतुकास्पद: १९ वर्षीय गोल्फपटूने उचलली १३०० जणांच्या लसीकरणाची जबाबदारी!
2 IPL २०२१ दरम्यान हैदराबादच्या माजी क्रिकेटपटूचे निधन
3 IPL२०२१मधून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्सने भारतीय खेळपट्ट्यांना म्हटले ‘कचरा’!
Just Now!
X