आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस आहे. हा दिवस सर्व मित्र आणि मैत्रीसाठी खास असतो. अनेक वर्ष लांब गेलेल्या, न बोललेल्या मित्रांसाठी हा दिवस एक नव्या प्रवासाची सुरुवात करतो. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही, जिथे मैत्रीचे उदाहरण सापडत नाही. जर खेळांमध्ये पाहिले, तर लिओनेल मेस्सी आणि कोबे ब्रायंटची मैत्री सर्वश्रुत होती. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल टेनिस कोर्टवर कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, परंतु मैदानाबाहेर दोघेही घट्ट मित्र आहे. आजच्या खास दिवसानिमित्त भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने सर्व क्रिकेटपटू मित्रांना आजचा दिवस समर्पित केला.

”मित्र असतात आणि कुटुंब असते, पण नंतर हेच मित्र कुटुंब बनतात”, अशी सुरुवात युवराजने शेअर केलेल्या व्हिडिओने होत आहे. युवीच्या या व्हिडिओत धोनी आणि विराट नसल्याने चाहत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. धोनी आणि युवी यांच्यात चांगली मैत्री असल्याचे आपण नेहमी ऐकले आहे, मध्यंतरीच्या काळात या दोघांत आलबेल नसल्याचे समजले होते. आता युवराजने शेअर केलेल्या व्हिडिओत धोनीच नसल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

युवराजच्या व्हिडिओवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा – देशाचं यशस्वी नेतृत्व करणारा क्रिकेटपटू आता निवडणार टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ!

युवराज सध्या भारतातील करोनाला आळा घालण्यासाठी लागणाऱ्या उपक्रमांमध्ये व्यस्त आहे. त्याने मिशन १००० बेड्सद्वारे राज्यांना बेड्स पुरवले आहेत. युवराजव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या प्रयत्नातून करोनारुग्णांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपये जमा केले होते. पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर या खेळाडूंनीही करोना रुग्णांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे.