कोची : भारताचे माजी फुटबॉलपटू ओ. चंद्रशेखर मेनन (८५ वर्षे) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही महिने चंद्रशेखर विविध आजारांनी ग्रासले होते. मंगळवारी कोची येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रशेखर यांनी १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चंद्रशेखर यांनी भारतीय संघाचे नेतृत्वपदही भुषवले. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. १९५८ ते १९६६च्या काळात एकूण २५ सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. स्थानिक फुटबॉलमध्ये १९५९ ते १९६५ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.