News Flash

माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंग कालवश

मॉस्को येथे १९८०मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय संघाचे हॉकीपटू रविंदर पाल सिंग यांचे शनिवारी सकाळी करोनामुळे निधन झाले.

नवी दिल्ली : मॉस्को येथे १९८०मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय संघाचे हॉकीपटू रविंदर पाल सिंग यांचे शनिवारी सकाळी करोनामुळे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.

करोनाची लागण झाल्यामुळे २४ एप्रिलला रविंदर यांना लखनौ येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. करोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर रविंदर यांना गुरुवारी बिगरकोविड कक्षात स्थलांतरित करण्यात आले. शुक्रवारी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. पण शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पुतणी प्रज्ञा यादव यांनी दिली. १९७९ ते १९८४ या कालखंडात ‘सेंटर-हाफ’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:30 am

Web Title: former hockey player ravinder pal singh passed away ssh 93
Next Stories
1 दडपणाखाली कामगिरी बहरते! राही सरनोबतला खात्री
2 सीमाला सुवर्णपदक
3 क व च भं ग
Just Now!
X