News Flash

IPL : किंग्ज इलेव्हन पंजाब अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी नेमण्यात उत्सुक

कुंबळेची संघ प्रशासनासोबत चर्चा सुरु

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे आगामी हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदी दिसण्याची शक्यता आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार अनिल कुंबळे आणि पंजाबचं संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरु असून, येत्या काही दिवसांमध्येच याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

अनिल कुंबळेने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं आहे. २०१६ साली अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. याव्यतिरीक्त पंजाबचं संघ व्यवस्थापन माईक हसी, जॉर्ज बेली आणि इतर खेळाडूंशी चर्चा करत आहे. त्यामुळे अखेरीस मुख्य प्रशिक्षकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार खेळाडूंचा लिलाव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 10:38 am

Web Title: former india captain anil kumble in talks with kings xi punjab for coaching job psd 91
Next Stories
1 Ind vs SA : मैदानावर पाऊल ठेवताच रोहित-मयांक ठरले अनोख्या विक्रमाचे मानकरी
2 Ind vs SA 1st Test : पावसाच्या व्यत्ययामुळे उर्वरित दिवसाचा खेळ रद्द
3 मुंबई क्रिकेट संघटना निवडणूक : निवडणूक अटळ!
Just Now!
X