News Flash

सचिन तेंडुलकर करोना पॉझिटिव्ह

सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली

फाइल फोटो (फोटो सौजन्य: व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोनाची लागण झाली आहे. सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. आपण होम क्वारंटाइन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे असं सचिनने म्हटलं आहे.

“करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसेच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे,” असं सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच “मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असं म्हणथ त्यांनी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानलेत.

नुकताच सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं. सचिन भारत सरकारच्या करोनासंदर्भातील जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. अनेक क्रिकेटपटुंनी मास्क घालण्यासंदर्भात केलेल्या विशेष व्हिडीओमध्ये सचिनसोबत सौरभ गांगुली, राहुल द्रवीड यासारख्या खेळाडूंनी सहभाग घेत जनजागृती केली होती. काही दिवसांपूर्वीच सचिन रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचा अंतिम सामना खेळून परतल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जळच्या व्यक्तींच्या चाचण्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नियमांनुसार या व्यक्तींनाही करोना चाचणी करावी लागणार आहे.

करोना वाढत असल्याने जमावबंदीचे आदेश

राज्यात काही दिवसांपासून करोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मॉल्स रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 10:37 am

Web Title: former india captain sachin tendulkar tests positive for covid 19 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Ind vs Eng : दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याला का नाही दिली गोलंदाजी? विराट म्हणतो…
2 आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने नवी मुंबईत
3 तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक
Just Now!
X