भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि माजी ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियन प्रकाश पादुकोण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर प्रकाश पादुकोण यांना १ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता, परंतु सर्वजण घरीच क्वारंटाइन होते.

६५ वर्षीय पादुकोण १९८०मध्ये ऑल इंग्लंड ओपन जेतेपद जिंकणारे पहिला भारतीय खेळाडू ठरले होते. त्याच्या पुढच्या वर्षी ते अंतिम फेरीतही पोहोचले. कोपेनहेगन येथे १९८३च्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. प्रकाश पादुकोण यांची मुलगी आणि बॉलिवूड स्टार दीपिकालाही करोना झाला होता.

करोनामुळे बॉलिवूडमधील कलाकार अडचणीत

करोनामुळे बॉलिवूड क्षेत्राची अत्यंत वाईट अवस्था वाईट झाली आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक कलाकारांना करोना झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर हिचे वडील रणधीर कपूरना सुद्धा करोना झाला. याशिवाय ‘पटियाला बेब्स’ फेम अनिरूद्ध दवे, ‘बिग बॉस १४’ फेम रूबिना दिलैक यांनाही या आजाराने ग्रासले. काही दिवसांपूर्वी वडिलांना गमावलेल्या हिना खान सुद्धा करोनाशी झुंज देत होती. आता ती या आजारातून सावरली आहे.