04 March 2021

News Flash

कबड्डीच्या मैदानापाठोपाठ धोनीने गाजवले टेनिस कोर्ट

काही दिवसांपूर्वी धोनी कबड्डीच्या मैदानात उतरला होता

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. आता ६ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दोनही मालिकांसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा संघात समावेश नसल्याने तो विविध क्रीडाप्रकार खेळताना दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबियांना वेळ देत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलीबरोबरचे आनंदाचे क्षणही शेअर केले आहेत. त्याचबरोबर तो विविध खेळ खेळण्याची आपली हौसही पूर्ण करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धोनी कबड्डीच्या मैदानात उतरला होता. आता त्याने टेनिसचे मैदान गाजवले आहे.

झारखंडमधील कंट्री क्रिकेट क्लबने एका टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत धोनी पुरुष दुहेरी विभागात टेनिस खेळायला उतरला. यावेळी धोनीला त्याचा मित्र सुमितने साथ दिली. धोनी आणि सुमित यांचा सामना ब्रजेश आणि पवन यांच्याबरोबर झाला. या सामन्यात धोनी आणि सुमित यांनी प्रतिस्पर्ध्यांवर ६-१, ६-१ असा विजय मिळवला आणि टेनिस कोर्टही गाजवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 7:00 pm

Web Title: former indian captain ms dhoni played tennis at jharkhand
टॅग : Ms Dhoni,Tennis
Next Stories
1 मी होते रमेश पोवारच्या नजरकैदेत; मिताली राजचा गौप्यस्फोट
2 हा मला संपवण्याचा डाव – मिताली राज
3 यासीरचा ‘१० का दम’; केली कुंबळेच्या कामगिरीची पुनरावृत्ती
Just Now!
X