News Flash

आणखी एका माजी क्रिकेटपटूचा भाजपात प्रवेश

चेन्नईमध्ये केला पक्षप्रवेश

गौतम गंभीर याच्यानंतर आणखी एका माजी क्रिकेटपटूनं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामाकृष्णन (Laxman Shivramakrishnan) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधनासभामध्ये निवडणूक लढवणार आहेत.

तामिळनाडूमध्ये भाजपा पक्ष आधिक मजबूत करण्यासाठी शिवरामाकृष्णन पक्षाला मजबूत करण्याचं काम करणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सीटी रवी आणि तामीळनाडू भाजपा अध्यक्ष एल मुरुगन यांच्या उपस्थितीमध्ये शिवरामाकृष्णन यांनी चेन्नईत भाजपामध्ये प्रवेश केला.

लक्ष्मण शिवरामाकृष्ण यांनी १७ व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. शिवरामाकृष्ण यांनी भारतीय संघाकडून नऊ कसोटी सामने, २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. शिवरामाकृष्णन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फक्त चार वर्षच होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शिवरामाकृष्ण यांनी ७६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी १५४ विकेट घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शिवरामाकृष्णन यांनी समालोचन म्हणून काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 5:01 pm

Web Title: former indian cricketer joins bharatiya janata party nck 90
Next Stories
1 मालिकेत अपयशी ठरणारा स्मिथ अश्विनबद्दल म्हणाला….
2 उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, वॉर्नरसह हुकुमी एक्के संघात परतले
3 “भारतानं ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारलं”; रावळपिंडी एक्सप्रेसने अजिंक्यचंही केलं कौतुक
Just Now!
X