News Flash

सचिन-युसूफनंतर इंडिया लेजेंड्सच्या अजून एका क्रिकेटपटूला करोनाची लागण!

ट्विट करून दिली माहिती

यंदाच्या रोड सेफ्टी सीरिज स्पर्धेचा विजेता संघ म्हणजेच इंडिया लेजेंड्स सध्या करोनाच्या संकटात अडकला आहे. संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने करोनाची लागण झाल्यासंबंधी सांगितले होते. त्यानंतर माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाणचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता याच संघाच्या एका फलंदाजाला करोनाचा संसर्ग झाला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि इंडिया लेजेंड्सचा फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथला करोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. बद्रीनाथ म्हणाला, ”माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. मी करोनासंबधित नियमांचे पालन करत असून घरी क्वारंटाइन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.”

 

युसूफ पठाण पॉझिटिव्ह

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याचे शनिवारी रात्री समोर आले. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरला करोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.

सचिनही होम क्वारंटाइनमध्ये…

सचिनने करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विट करून माहिती दिली होती. तसेच आपण होम क्वारंटाइनमध्ये असल्याचेही सांगितले होते. “करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असे सचिन म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 5:04 pm

Web Title: former indian cricketer subramaniam badrinath tests positive for covid 19 adn 96
Next Stories
1 ”ऋषभ पंत असाच खेळत राहिला, तर धोनीला मागे टाकेल”
2 वयाच्या 20व्या वर्षी कसोटीत शतक ठोकणाऱ्या माजी क्रिकेटपटूला दिल्लीने केले प्रशिक्षक!
3 ‘ही जोडी तुटायची नाय’, रोहित-धवनचा वनडे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
Just Now!
X