News Flash

VIDEO: अनुष्काबद्दल नक्की काय म्हणाले होते गावसकर? तुम्हीच ऐका…

विराट पंजाब विरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना घडला प्रकार

माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पंजाब वि. बंगळुरू सामन्यात समालोचन करताना विराटवर टीका केली आणि त्यातच अनुष्काचाही उल्लेख केला. विराट फलंदाजी करत असताना गावसकर यांनी, “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने”, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर काहींनी टीका केली. इतकंच नव्हे तर खुद्द अनुष्कानेदेखील गावसकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तुम्हीच ऐका नक्की काय म्हणाले होते सुनील गावसकर…

सुनील गावसकर कॉमेंट्री करताना म्हणाले…

गावसकरांच्या विधानावर अनुष्काने व्यक्त केली नाराजी

सुनील गावसकर यांनी अशाप्रकारे उपरोधिक टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली आणि तिने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. “इतर खेळाडूंच्या कामगिरीसाठी त्यांच्या जोडीदारांना नावं ठेवली जात नाहीत. तशी वागणूक मला केव्हा मिळणार? मी अपेक्षा करते की पुढच्या वेळी तुम्ही विराटच्या खेळीचं वर्णन करताना माझा संदर्भ येऊ देणार नाही”, अशा स्पष्ट शब्दात अनुष्काने गावसकर यांना सुनावलं.

सुनील गावसकर यांनी दिलं स्पष्टीकरण

“ज्यांना माझ्या वक्तव्यावर आक्षेप असेल किंवा ज्यांना कोणाला माझं वक्तव्य खटकलं असेल, त्यांनी ती क्लिप नीट ऐका आणि मला सांगा की मी काय चुकीचं बोललो? मी अनुष्काला दोषी ठरवलं नाही. कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणीही केलेली नाही. तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडीओ बघा. मी काय बोललो ते नीट ऐका मग हवं ते खुशाल बोला. शीर्षकांवर (हेडलाइन्सल) विश्वास ठेवू नका. स्वत: व्हिडीओ बघा. मी माझ्या भूमिकेबाबत साशंक नाही”, असं रोखठोक मत गावसकर यांनी मांडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 4:05 pm

Web Title: former indian cricketer sunil gavaskar what exactly said in commentary video anushka sharma lockdown virat kohli ipl 2020 vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 अनुष्का प्रकरणावर रोहन गावसकरने केलं सूचक ट्विट, म्हणाला…
2 गावस्कर वादाच्या भोवऱ्यात!
3 यूएफा सुपर चषक फुटबॉल : बायर्न म्युनिकला जेतेपद
Just Now!
X