News Flash

खेळाडूंच्या फटक्याचा ‘झेड बॅट’द्वारे आढावा

माजी कसोटीपटू आकाश चोप्राची झेड बॅटच्या सहसंस्थापकपदी निवड

एखाद्या क्रिकेटपटूची फलंदाजीची शैली तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, अथवा त्याने लगावलेला फटका नेमका कोणता होता, याचा आढावा घेणाऱ्या ‘झेड बॅट’ला सध्या जगभरातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही (आयसीसी) मान्यता मिळालेल्या या बॅटच्या सहसंस्थापकपदी बुधवारी भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्राची निवड करण्यात आली.

समिर शाह आणि हर्षल शाह यांनी सुरू केलेल्या या बॅटच्या कंपनीद्वारे खेळाडूंना त्यांच्या फलंदाजी शैलीनुसार कोणती बॅट योग्य आहे, हेसुद्धा सांगण्यात येते. त्याशिवाय वजनानुसार खेळाडूंनी कशाप्रकारे बॅट हाताळावी अथवा या बॅटचा वापर करून दुखापतींपासून स्वत:ला कसे दूर ठेवावे, याबाबतीत बॅटच्या अधिकृत संकेतस्थळावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. मुंबईतील परळ येथे या बॅटची कंपनी उघडण्यात आली असून बॅटच्या हँडलवर लावण्यात आलेल्या तांत्रिक उपकरणाद्वारे फलंदाजाने मारलेला फटका कितपत योग्य लगावण्यात आला, याची कल्पनाही खेळाडूला दिली जाते.

“युवा पिढीतील खेळाडूंसाठी ‘झेड बॅट’ फार लाभदायक आहे. क्रिकेटमध्ये विज्ञानाला जोड देऊन साधलेल्या या आविष्कारामुळे खेळाडूंना त्यांच्या फलंदाजीत अधिक सुधारणा करता येतील. त्याशिवाय दुखापतींपासूनही ते स्वत:चे संरक्षण करू शकतील. ‘झेड बॅट’चा सहसंस्थापक तसेच एक क्रिकेटपटू म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या बॅटची ख्याती पसरवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असे चोप्रा म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:26 pm

Web Title: former indian player aakash chopra associated with z bat company psd 91
Next Stories
1 पहिली पसंती भारतालाच !! आयपीएल आयोजनावरुन सौरव गांगुलीचं महत्वपूर्ण विधान
2 आशिया चषकाचं आयोजन रद्द, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती
3 धोनीच्या निवृत्तीवर महत्त्वाची अपडेट; मॅनेजरने दिली माहिती
Just Now!
X