करोना विषाणूमुळे देशात आणि जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. भारतात मुंबई, दिल्ली, बंगळुरु यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. सरकारी यंत्रणा या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सरकारही प्रत्येक पातळीवर लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यरत आहे. यामध्ये भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही महत्वाचं पाऊल उचललं आहे.

World Health Organization आणि UNISEF च्या माध्यमातून सचिनने ‪#SafeHandsChallenge नावाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत स्वच्छता राखण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, याबद्दल सचिनने मार्गदर्शन केलं आहे. पाहा सचिनचा हा मोलाचा संदेश…

देशात सध्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. महाराष्ट्रात एका रुग्णाला करोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकारी यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.