News Flash

प्रतिस्पर्धी संघाच्या क्रिकेटपटू अडकल्या विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हेली जेन्सन आणि निकोला हॅनकॉक विवाहबंधनात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन महिला खेळाडूंनी लग्नगाठ बांधली आहे. न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाची निकोला हॅनकॉक या विवाहबंधनात अडकल्या आहेत. या दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळत होत्या. मेलबर्न स्टार्सनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन या दोघींना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला खेळाडू लग्नबंधनात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या डेन वेन निकर्क आणि मारिजाने कॅप यांनीही गेल्यावर्षी लग्न केलं होतं. न्यूझीलंडकडून ७ एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळणारी हेली जेलसन जलदगती गोलंदाज आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या निकोला हॅनकॉकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणच केलं नाही. निकोला ही सध्या मेलबर्न स्टार्ससाठी बिग बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 2:40 pm

Web Title: former melbourne stars teammate hayley jensen nicola hancock tie knot
Next Stories
1 IPL 2019 : माझा ‘हेलिकॉप्टर शॉट’ही धोनीला आवडतो – हार्दिक पांड्या
2 ‘या’ भारतीय फलंदाजासमोर गोलंदाजी नकोच – यॉर्कर किंग लसिथ मलिंगा
3 रोहितचा त्रिफळा उडवला अन् ‘हा’ विक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय ठरला
Just Now!
X