19 November 2019

News Flash

भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत विक्रम राठोड यांची उडी

बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली माहिती

१९ वर्षाखालील भारतीय संघ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजी प्रशिक्षकाचा अर्ज बाद झाल्यानंतर, माजी निवड समितीच सदस्य विक्रम राठोड यांनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. लाभाचं पद भूषवण्याच्या मुद्द्यावरुन राठोड यांचा १९ वर्षाखालील प्रशिक्षकपदाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या सल्ल्यानुसार राठोड यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात बातमी दिली आहे.

विक्रम राठोड यांच्या शर्यतीत माजी क्रिकेटपटू प्रविण आमरेदेखील आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक संजय बांगर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वचषकातील उपांत्य सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयावरुन बांगर यांना टीकेचं धनी व्हायला लागलं होतं.

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक निवडणार आहे. रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रक्रियेत थेट सहभाग देण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडी रवी शास्त्री यांना टक्कर देण्याची शक्यता आहे. याचसोबत माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन सिंह, लालचंद राजपूत हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. माजी आफ्रिकन खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सनेही भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

First Published on August 3, 2019 7:03 pm

Web Title: former national selector vikram rathour eyes indias batting coach job psd 91
टॅग Bcci
Just Now!
X