News Flash

टी१० क्रिकेट ऑलिम्पिकसाठी योग्य – शाहिद आफ्रिदी

शाहिद आफ्रिदी हा सध्या T10 Cricket League स्पर्धेत पखतून्स या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

शाहिद आफ्रिदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच महिला क्रिकेटला राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिला क्रिकेट समाविष्ट करावे. त्यामुळे महिला क्रिकेटला प्रोत्साहन मिळेल आणि राष्ट्रकुल स्पर्धांचा प्रेक्षक वर्गही वाढेल, अशा हेतूने ही मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. या दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये टी१० म्हणजे १० षटकांचे क्रिकेट सामने खेळवणे योग्य ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने व्यक्त केले आहे.

शाहिद आफ्रिदी हा सध्या T10 Cricket League स्पर्धेत पखतून्स या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी टी१० क्रिकेट हा फॉरमॅट योग्य आहे. आम्ही त्या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा आनंद घेत आहोत. या प्रकारामध्ये कमी वेळेत चाहत्याचे भरपूर मनोरंजन होते आणि मनोरंजन होणे हेच महत्वाचे असते, असे तो म्हणाला.

टी१० क्रिकेटमध्ये गोलंदाजांची कसोटी लागते. फलंदाजही आपली प्रतिभा दाखवू शकतात. या प्रकारच्या क्रिकेटमुळे टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची पद्धतदेखील बदलेल, असे आफ्रिदी म्हणाला.

याबाबत बोलताना इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन म्हणाला की टी२० क्रिकेटचा सामना हा थोडासा रटाळ आणि लांब वाटतो. पण टी१० क्रिकेट हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये खेळवण्याबाबत परतावं मांडता येऊ शकेल, असे त्याने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2018 12:16 pm

Web Title: former pakistan captain shahid afridi says t10 cricket is suited for olympics
टॅग : Shahid Afridi
Next Stories
1 क्रिकेटपटूंचे गुरुकुल, प्रशिक्षकांचेही विद्यापीठ!
2 गौतमच्या सहा बळींमुळे न्यूझीलंडचा डाव संपुष्टात
3 कोहलीला बाद करण्याची आमच्या गोलंदाजांमध्ये क्षमता – टिम पेन
Just Now!
X