28 October 2020

News Flash

विरेंद्र सेहवाग खोटारडा माणूस आहे – शोएब अख्तर

२००३ विश्वचषकादरम्यान विरुने सांगितलेला किस्सा खोटा !

२००३ साली दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली विश्वचषक स्पर्धा प्रत्येक भारतीय चाहत्याच्या लक्षात आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर जोडीने पाक गोलंदाजांची केलेली धुलाई आजही क्रिकेट प्रेमी आवडीने सोशल मीडियावर पाहत असतात. सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार हा त्या स्पर्धेत चर्चेचा विषय ठरला होता. या स्पर्धेत अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना सहन करावा लागला, तरीही भारत-पाक सामन्यात शोएब आणि सेहवागमध्ये गाजलेलं द्वंद्व प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरलं होतं.

या सामन्यात शोएब अख्तरने आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी त्याला बाप बाप होता है, बेटा बेटा होता है असं म्हटल्याचं विरेंद्र सेहवागने अनेक मुलाखती व टिव्ही कार्यक्रमात सांगितलं होतं. परंतू हॅलो अ‍ॅपसाठी पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत सेहवाग यांनी सेहवागचा हा दावा फेटाळून लावला आहे. मैदानात मला कोणी असं बोललं असतं तर मी त्याला कधीही सोडलं नसतं अशा शब्दांत शोएब अख्तरने विरेंद्र सेहवागने सांगितलेली गोष्ट घडलीच नसल्याचं म्हटलंय. पाहा काय म्हणाला शोएब अख्तर…

सध्या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत विरुद्ध पाक मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. परंतू भारतीय खेळाडूंनी या पर्यायाला विरोध दर्शवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:43 pm

Web Title: former pakistan pacer shoaib akhtar reject claim maade by virendra sehwag during 2003 wc says he is lying psd 91
Next Stories
1 ना विराट, ना रोहित… हा फलंदाज सर्वात धडाकेबाज – जोफ्रा आर्चर
2 “एकाच वेळी दोन सामने असल्यास विराटपेक्षा रोहितचा सामना बघेन, कारण…”
3 रैनाच्या मागणीवर BCCI चं रोखठोक उत्तर
Just Now!
X