News Flash

हिंदू असल्याने त्रास देणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची नावे जाहीर करणार – दानिश कनेरिया

शोएब अख्तरने गौप्यस्फोट करत फक्त हिंदू असल्या कारणाने दानिश कनेरिया याला संघातील इतर खेळाडूंकडून वाईट वागणूक दिली जात होती असा खुलासा केला होता

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने गौप्यस्फोट करत फक्त हिंदू असल्या कारणाने दानिश कनेरिया याला संघातील इतर खेळाडूंकडून वाईट वागणूक दिली जात होती असा खुलासा केला होता. शोएब अख्तरने केलेल्या या दाव्यावर आता खुद्द दानिशने खुलासा केला असून हे सर्व सत्य असून पाकिस्तान संघात आपल्यासोबत भेदभाव करण्यात आल्याचं सांगितलं आहे. शोएब अख्तरने हा खुलासा केल्याबद्दल दानिशने त्याचे आभार मानले असून त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचा दुजोरा दिला आहे.

“शोएब अख्तरने सत्य सांगितलं आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे मी जाहीर करणार. याआधी या विषयावर बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण आता मी बोलणार,” असं दानिशने एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते असा खुलासा केला होता. पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत दानिश चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत पाकिस्तानी संघाकडून खेळले आहेत.

शोएब अख्तरने या विषयावर भाष्य केल्याने आता आपल्याला धैर्य मिळालं असून लवकरच त्या सर्व खेळाडूंची ज्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली त्यांची नावं जाहीर करणार असल्याचं दानिशने जाहीर केलं आहे. यावेळी त्याने एकीकडे संघात काही खेळाडू दुजाभाव करत असताना युनिस खान, इंजमाम, मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर यांच्यासारखे खेळाडू आपल्या धर्माची चिंता न करता चांगली वागणूक द्यायचे असंही सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 10:29 am

Web Title: former pakistan spinner danish kaneria hindu shoaib akhtar sgy 87
Next Stories
1 भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका : मुंबईकर दिव्यांशचे दिमाखदार अर्धशतक
2 सुमित सांगवानवर एक वर्षांसाठी बंदी
3 ऑलिम्पिक पात्रतेच्या निवड प्रक्रियेला गौरवकडून आव्हान
Just Now!
X