भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू गुलाम बोदी मॅच-फिक्सिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक रॅम स्लॅम ट्वेन्टी-२० स्पर्धेची लढतीचा निकाल निश्चित केल्याप्रकरणी बोदी याचे नाव समोर आले आहे. ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बोदीवर सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अन्य खेळाडूंना त्यासाठी उद्युक्त करणे असे आरोप ठेवण्यात आले आहे.
३७ वर्षीय बोदीने दोन एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० लढतीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या २०१२ हंगामात बोदी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. बोदी मूळचा गुजरातचा असून, तो लहान असताना त्याच्या कुटुंबियांनी दक्षिण आफ्रिकेला स्थलांतर केले.