News Flash

द.आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जोहान बोथा आता ऑस्ट्रेलियाचा नागरिक!

जोहान बोथाने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्विकारल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे

माझे आणि माझ्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी येथील नागरिकत्व स्विकारले आहे, असे बोथा म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाकडून ७८ एकदिवसीय सामने खेळलेला माजी क्रिकेटपटू जोहान बोथा आता ऑस्ट्रेलियाचा नागरिक झाला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर संघाने याबाबतचे अधिकृत माहिती दिली आहे. जोहान बोथा सध्या या लीगमध्ये सिडनी सिक्सर संघाकडून खेळतो. जोहान बोथाने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्विकारल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासन जोहान बोथा ऑस्ट्रेलियामध्येच स्थायिक झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाल्याने आनंदी असल्याचे बोथाने सांगितले. चार वर्षांपूर्वी जेव्हा द.आफ्रिकासोडून ऑस्ट्रेलियात आलो तेव्हा येथे कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा कोणताही मानस नव्हता. पण, जसा वेळ गेला तसे येथील परिस्थितीशी जुळवून घेता आले. माझे आणि माझ्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी येथील नागरिकत्व स्विकारले आहे, असे बोथा म्हणाला.

जोहान बोथा हा द.आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू राहिला असून त्याने आफ्रिकेच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्त्व देखील केले होते. बोथा आणि त्याचे कुटुंबिय सध्या ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे स्थायिक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 7:10 pm

Web Title: former south african t20 skipper johan botha is now an australian citizen
Next Stories
1 ख्रिस्तियानो रोनाल्डो या माजी फुटबॉलपटूचा चाहता
2 पी.व्ही.सिंधूचा हाँगकाँग ओपनच्या उपांत्यूपर्व फेरीत प्रवेश
3 अनुभव आणि यष्टीरक्षणाच्या गुणांवर पार्थिव पटेलची निवड- कुंबळे
Just Now!
X