श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेत्तीगे याच्यावर ICC ने मॅच फिक्सिंग प्रकरणी कारवाई केली आहे. ICCच्या नियमावलीतील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याला तीन नकारात्मक गुणही देण्यात आले आहेत. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या T10 Cricket League स्पर्धेत फिक्सिंग केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिलहारा लोकुहेत्तीगे याने श्रीलंकेकडून २००५ ते २०१३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात ९ एकदिवसीय आणि २ टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्याला तात्काळ प्रभावाने ICCने निलंबित केले आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी त्याचे कलम २.१.१ अंतर्गत तात्पुरते निलंबन केले आहे.

दिलहारा लोकुहेत्तीगे याला ICCने आजपासून पुढील १४ दिवसात आपली बाजू मांडण्याचा कालावधी दिला आहे.