05 March 2021

News Flash

सनथ जयसूर्यावर आयसीसीची कारवाई, दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा

चौकशीत सहकार्य न केल्याचा ठपका

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. जयसूर्याने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्यानंतर आयसीसीने जयसूर्याला ही शिक्षा सुनावली आहे.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असताना, जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. या आरोपांच्या तपासासाठी आयसीसीचं भ्रष्टाचारविरोधी पथक श्रीलंकेत आलं होतं. मात्र जयसूर्याने या पथकाला चौकशीत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चौकशीला असहकार्य केल्याचा ठपका ठेवत जयसूर्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 6:36 pm

Web Title: former sri lankan player sanath jayasuriya banned from all cricket for two years after admitting breaching icc anti corruption code
Next Stories
1 IND vs AUS : टीम इंडियाच्या सरावाचा खास फोटो पाहिलात का?
2 Video : बॉडीगार्डच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला विराट, दिलं खास गिफ्ट
3 Surgical Strike 2 : भारतीय क्रीडापटूंनी केला भारतीय वायुसेनेला सलाम!
Just Now!
X