News Flash

माजी टेबल टेनिसपटू चंद्रशेखर यांचे करोनामुळे निधन

‘चंद्रा’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रशेखर यांनी तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

चेन्नई : अर्जुन पुरस्कार विजेते माजी भारतीय टेबल टेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे बुधवारी करोनामुळे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

‘चंद्रा’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रशेखर यांनी तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. तामिझागा टेबल टेनिस संघटनेचे ते अध्यक्ष आणि संचालक होते. याचप्रमाणे ‘एसडीएटी’-मेडिमिक्स टेबल टेनिस अकादमीचे ते मुख्य प्रशिक्षक होते.

चंद्रशेखर यांनी १९८२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:27 am

Web Title: former table tennis player chandrasekhar dies due to corona akp 94
Next Stories
1 सायना, श्रीकांतचा ऑलिम्पिक स्वप्नभंग?
2 ऑलिम्पिकआधी स्पर्धांची नितांत आवश्यकता -नीरज
3 द्रविडमुळे भारताची युवा फळी गुणवान -चॅपेल
Just Now!
X