क्वालालम्पूर : जागतिक क्रमवारीत एके काळी सहाव्या स्थानापर्यंत पोहोचलेला डेन्मार्कचा जोकीम पेरसोन याने सामनानिश्चिती आणि सट्टेबाजीला साहाय्य केल्याचे कारण देत जागतिक बॅडमिंटन महासंघाने त्याच्यावर दीड वर्षांसाठी बंदी घातली आहे. चार प्रकरणांमध्ये जोकीम हा दोषी आढळला आहे. त्याला दीड वर्षांच्या बंदीसह ४५०० डॉलर्स इतकी रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. गतवर्षी मलेशियाच्या दोघा बॅडमिंटन खेळाडूंवर सामनानिश्चिती आणि भ्रष्टाचार प्रकरणात १५ आणि २० वर्षे बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे त्या तुलनेत ही कारवाई सौम्यच मानली जात आहे.