पुढील आठवडय़ात होणाऱ्या सत्रातील पहिल्या शर्यतीत प्रमुख चालक म्हणून शर्यतीत उतरवावे याकरिता सौबेर संघाला फॉम्र्युला वन चालक जिएडो व्हान डर गॅर्डेने ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयात खेचले आह़े  गॅर्डेच्या वकिलाने या संदर्भातील कागदपत्रे व्हिक्टोरियन सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सादर केली असून सोमवारी यावर सुनावणी व्हावी, अशी विनंती केली आह़े  सत्रातील पहिली शर्यत ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. १५ मार्चला मेलबर्न येथे होणार आह़े  गत सत्रात गॅर्डे हा सौबेर संघात राखीव चालक म्हणून होता़  यंदाच्या सत्रात त्याला मुख्य चालक म्हणून करारबद्ध केल्याचा दावा त्याने केला आह़े  मात्र, आर्थिक अडचणींमुळे संघाने मक्र्युस एरिक्सन आणि फेलिपे नॅस्र यांना मुख्य चालक म्हणून सहभागी केले आह़े