‘व्रुम.. व्रुम..’च्या निनादणाऱ्या आवाजाची सलामी येत्या रविवारी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये अनुभवायला मिळणार आहे. निमित्त आहे वर्षांतल्या पहिल्यावहिल्या फॉम्र्युला वन शर्यतीचे. गेल्या वर्षी जेतेपद पटकावणारा ल्युइस हॅमिल्टन या पहिल्या शर्यतासाठी जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र त्यासाठी त्याला निको रोसबर्गचे कडवे आव्हान आहे. मर्सिडिज संघाच्या या सहकाऱ्यांमध्ये रंगणारा मुकाबला मेलार्न शर्यतीचे विशेष आकर्षण आहे.
या दोघांव्यतिरिक्त सेबॅस्टिअन वेटलने रेड बुलला रामराम करून फेरारी संघात प्रवेश केला आह़े  त्यामुळे हॅमिल्टन व रोसबर्ग यांना टक्कर देण्यासाठी तो तयार आहे. फेलिप मास्सा आणि वॉल्टेरी बोटास हे विलियम्स संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी तयार आहेत़  हंगामातील पहिल्या शर्यतीत जेतेपद पटकावून हॅमिल्टन विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सर्वासमोर येण्यासाठी पुन्हा सज्ज आह़े  तो म्हणतो, ‘‘माझा आवडता शर्यतपटू आयर्टन यांनी कारकिर्दीत जे साध्य केले, ते मला मिळवायचे आह़े  २००८मध्ये ही शर्यत जिंकलो होतो़  त्यानंतर या शर्यतीचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदा ही कसर भरून काढीन.’’
मर्सिडिजचे वर्चस्व
ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि स्पध्रेच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडिज संघाने वर्चस्व गाजविल़े  मेलबर्न अल्बर्ट पार्क सर्किटवर पार पडलेल्या सराव सत्रात निको रोसबर्गने (१:२७:६९ सेकंद) दिवसातील जलद वेळ नोंदविली, तर   ल्युइल हॅमिल्टनने दहा सेकंदानंतर लॅप्स पूर्ण केल्या़

नियमात बदल
*पॉवर युनिट्स : २०१४मध्ये शर्यतपटूला पाच वेळा पॉवर युनिट्स बदलण्याची संधी होती, परंतु यंदा त्यांना चार वेळाच युनिट्स बदलता येणार आह़े  संपूर्ण युनिट्स बदलल्यावर चालकाला बसणारा दंड आता त्या युनिट्सच्या घटक बदलावर अवलंबून असेल़
*१० सेकंदांचा दंड : शर्यतीदरम्यान किरकोळ उल्लंघन केल्यास २०१४च्या सत्रात असलेला ५ सेकंदांचा दंड आता १० सेकंदांचा करण्यात आलेला आह़े
*गाडीचे वजन : यंदाच्या सत्रात इंधनाशिवाय गाडीचे वजन ७०२ किलो असणे आवश्यक आहे.

..तरीही अलोन्सोची बाजारात तेजी
फॉम्र्युला-वन शर्यतीचा शेवटचा हंगाम ल्युइस हॅमिल्टन याने गाजवला असला तरी बाजारात मागणी असणाऱ्या चालकांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आह़े  या यादीत फर्नाडो अलोन्सोने बाजी मारली आह़े ‘रेप्युकॉम’च्या सव्रेक्षणानुसार अलोन्सो अव्वल स्थानावर असून त्यापाठोपाठ फेलिपे मास्सा, सिबॅस्टियन वेटल हे येतात़

संकलन : स्वदेश घाणेकर

वर्षांचे वेळापत्रक
ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि़ – अल्बर्ट पार्क, १५मार्च
मलेशियन ग्रां. प्रि़ – सेपांग, २९ मार्च
चायनीज ग्रां. प्रि़ – शांघाय, १२ एप्रिल
बहरिन ग्रां. प्रि़ – सखिर, १९ एप्रिल
स्पॅनिश ग्रां. प्रि़  – बार्सिलोना़, १० मे
मोनॅको ग्रां. प्रि़ –  मोंटे कार्लो, २४ मे
कॅनेडियन ग्रां. प्रि़ – मॉन्ट्रिअल, ७ जून
ऑस्ट्रियन ग्रां. प्रि़  – स्पायलबर्ग, २१ जून
ब्रिटिश ग्रां. प्रि़  – सिल्व्हरस्टोन, ५ जुलै
जर्मन ग्रां. प्रि़  – नुरबरग्रीन, १८ जुलै
हंगेरियन ग्रां. प्रि़  – हंगेरोरिंग, २६ जुलै
बेल्जियम ग्रां. प्रि़  – स्पा – फ्रांसोरचॅम्प, २३ ऑगस्ट
इटालियन ग्रां. प्रि़  – मोंझा, ६ सप्टेंबर
सिंगापूर ग्रां. प्रि़  – मरिना बे, २० सप्टेंबर
जापनीज ग्रां. प्रि़  – सुझुका, २७ सप्टेंबर
रशियन ग्रां. प्रि़  – सोची, ११ ऑक्टोबर
यूएस ग्रां. प्रि़  – ऑस्टीन, २५ ऑक्टोबर
मॅक्सिकन ग्रां. प्रि़  – मॅक्सिको सिटी, १ नोव्हेंबर
ब्राझिलियन ग्रां. प्रि़  – इंटरलॅगोस, १५ नोव्हेंबर
अबुधाबी ग्रां. प्रि़  – यस मारिना, २९ नोव्हेंबर