News Flash

वेटेलची ‘फेरारी की सवारी’

जगभरातील सर्किटवर गेले वर्षभर राज्य गाजवणाऱ्या लुईस हॅमिल्टन व मर्सिडीज यांच्या मक्तेदारीला रविवारी जबर धक्का बसला.

| March 30, 2015 01:44 am

जगभरातील सर्किटवर गेले वर्षभर राज्य गाजवणाऱ्या लुईस हॅमिल्टन व मर्सिडीज यांच्या मक्तेदारीला रविवारी जबर धक्का बसला. २०१३नंतर जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या सेबॅस्टियन वेटेलने मलेशियन ग्रां. प्रि. शर्यतीमध्ये बाजी मारली. रेड बुल संघाला सोडचिठ्ठी देणाऱ्या वेटेलने फेरारी संघाकडून हे पहिलेच जेतेपद पटकावले.
वेटेलने एक तास ४१ मिनिटे व ०५.७९३ सेकंदांची वेळ नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली. गतविजेत्या हॅमिल्टनला ८.५६९ सेकंदाच्या फरकाने दुसऱ्या, तर निको रोसबर्गला १२.३१० सेकंदाच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल़े  वर्षांतील पहिल्याच शर्यतीमध्ये वेटेलने दुसरे स्थान पटकावून हॅमिल्टनला कडवी टक्कर दिली होती. हॅमिल्टनसाठी तो धोक्याचा इशारा होता. मात्र हॅमिल्टनने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा फटका रविवारी बसला. वेटेलने सुरुवातीपासूनच हॅमिल्टन आणि रोसबर्ग यांच्यावर कुरघोडी केली. तिसऱ्या लॅपपर्यंत आघाडीवर असलेल्या हॅमिल्टनला चौथ्या लॅपमध्ये वेटेलने मागे टाकले आणि आघाडी घेतली़  वेटेलने ही आघाडी १५व्या लॅपपर्यंत कायम राखली होती़  त्यानंतर १८व्या लॅपमध्ये हॅमिल्टन आणि रोसबर्ग यांनी आघाडी घेत शर्यतीत चुरस निर्माण केली, परंतु वेटेलने कोणतीही चूक होऊ न देता शर्यतीत दमदार पुनरागमन केले व बाजी मारली.

मला शब्दच सुचत नाहीत. खूप आनंद झाला आहे. मर्सिडिज संघाला हरविल्याचा अभिमान वाटतो. फेरारीसाठी विश्वजेतेपद पटकवायचे आमचे ध्येय आहे, परंतु सध्या  विजयाचा आनंद साजरा करायचा आह़े
– सेबॅस्टियन वेटेल
सेबॅस्टियन वेटेलने चौथ्यांदा मलेशियन ग्रां. प्रि.चे विजेतेपद जिंकून येथे सर्वाधिक जेतेपद पटकावण्याचा विक्रम केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2015 1:44 am

Web Title: formula one sebastian vettel ferrari end drought in rain
टॅग : Sebastian Vettel
Next Stories
1 मुंबई संघांच्या पदरी निराशा
2 मेस्सीशिवाय अर्जेटिना विजयी
3 कोनेरू हम्पीचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X