06 July 2020

News Flash

ऑस्ट्रेलियात भारत आणि पाकच्या क्रिकेट समर्थकांमध्ये हाणामारी

ऑस्ट्रेलियात भारत आणि पाक यांच्यातील विश्वचषक सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले.

| February 16, 2015 03:58 am

ऑस्ट्रेलियात भारत आणि पाक यांच्यातील विश्वचषक सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले. सिडनी येथील एका क्लबमध्ये भारत आणि पाकिस्तानचे समर्थक विश्वचषकाची लढत बघत असताना हा प्रकार घडला. येथील मेरीलँडस आरएसएल क्लबमध्ये झालेल्या या हाणामारीत तब्बल ४० जणांचा सहभाग होता. या हाणामारीदरम्यान जखमी झालेल्या तिघांना येथील वेस्टमेड रूग्णालयात तर अन्य काहीजणांना औब्रन रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळत आहे. याप्रकरणात अजूनपर्यंत कोणालाही अटक झाली नसली तरी, सध्या पोलीस या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण तपासात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव केला होता. त्यावेळी या क्लबमध्ये तब्बल १४० जण जमले होते. तेव्हा काही कारणावरून सुरू झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. सीसीटीव्हीमधील चित्रणानुसार दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या दिशेने स्टुल्स फेकताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2015 3:58 am

Web Title: four hurt in brawl between india pakistan cricket fans in aus
Next Stories
1 आयपीएलसाठी आज लिलाव
2 आनंद-क्रामनिक लढत बरोबरीत
3 ललिता बाबरला सुवर्ण
Just Now!
X