जयपूर येथे २ ते ६ मार्च या कालावधीत होणाऱ्या ६७व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय रेल्वेच्या महिला संघात सोनाली शिंगटे, रक्षा नारकर, मीनल जाधव आणि अपेक्षा टाकळे अशा चौघींचा समावेश आहे. पुरुष संघात महाराष्ट्रातील एकमेव श्रीकांत जाधवला स्थान मिळाले आहे.

पुरुष संघाचे नेतृत्व पवन शेरावतकडे आणि महिलांचे नेतृत्व पायल चौधरीकडे सोपवले आहे. महाराष्ट्रातील राणाप्रताप तिवारी आणि गौतमी आरोस्कर अनुक्रमे रेल्वेच्या पुरुष व महिला संघांचे प्रशिक्षक आहेत. गतवर्षी रेल्वेने दोन्ही गटांमध्ये विजेतेपद पटकावले होते.

भारतीय रेल्वेचे संघ

*  पुरुष संघ : कर्णधार – पवन शेरावत, धर्मराज चेरलाथन, सुनील कुमार, परवेश भन्सवाल, रोहित गुलिया, रविंदर पहेल, श्रीकांत जाधव, संदीप धूल, रवी कुमार, दीपक नरवाल, विकास खंडोला, विजेंदर; प्रशिक्षक – संजीव कुमार, राणाप्रताप तिवारी; व्यवस्थापक – शिव नारायण.

*  महिला संघ : कर्णधार – पायल चौधरी, मोती चंदन, रितू कुमारी, रितू नेगी, कबिता सिंग, आय. पवित्रा, रक्षा नारकर, पिंकी रॉय, मीनल जाधव, सोनाली शिंगटे, अपेक्षा टाकळे, पूजा नरवाल; प्रशिक्षक – गौतमी आरोस्कर, एनानी साहा; व्यवस्थापक – धरमवीर जोगिराम.