26 September 2020

News Flash

श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुशल परेरावर चार वर्षांची बंदी

सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघातून त्याला वगळण्यात आले.

| December 26, 2015 04:33 am

उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी
बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्यांच्या सेवनप्रकरणी ‘ब’ चाचणीच्या नमुन्यांमध्ये दोषी आढळल्यामुळे श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुशल परेरावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
‘‘परेराला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आम्हाला कळवले आहे,’’ असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयाशेखरा यांनी सांगितले.
आयसीसीच्या चाचणीत बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्यांचे सेवन परेराने केल्याचे सिद्ध झाल्यानंतर कतार येथे त्याच्या मूत्रनमुन्याची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघातून त्याला वगळण्यात आले. श्रीलंकेने ही मालिका ०-२ अशी गमावली. उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवनप्रकरणी दोषी आढळणारा परेरा हा श्रीलंकेचा दुसरा क्रिकेटपटू आहे. २०११च्या विश्वचषकानंतर डावखुरा फलंदाज उपुल थरंगा दोषी आढळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 4:33 am

Web Title: four year ban on kusal perera
Next Stories
1 कामगिरीचा स्तर उंचावत ठेवा!
2 कामनेस्काया व सॅबेलेन्का अंतिम फेरीत
3 सुरुवात दणक्यात, पण..
Just Now!
X