पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका

रावळपिंडी येथे सुरू असलेल्या पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ अंधूक प्रकाश आणि पावसामुळे एकही चेंडू न फेकता रद्द करण्यात आला.

तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने पहिल्या डावात ९१.५ षटकांत ६ बाद २८२ धावा केल्या होत्या. धनंजय डिसिल्व्हा ८७, तर दिलरुवान परेरा ६ धावांवर खेळत आहे. शनिवारी चौथ्या दिवशी पहाटेपासूनच मुसळधार पावसाचा वर्षांव झाल्यामुळे दोन्ही संघांनी हॉटेलमध्येच राहणे पसंत केले. लढतीच्या पहिल्या दिवशी ६८.१, दुसऱ्या दिवशी १८.२, तर तिसऱ्या दिवशी फक्त ५.२ षटकांचा खेळ झाला.