News Flash

यजमान फ्रान्सचा निसटता विजय

ब्लेस मॅटुइडीने २०व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने आघाडी घेतली

वेस्ट हॅम युनायटेड क्लबच्या दिमित्री पॅयेटने ९०व्या मिनिटाला केलेल्या गोलने युरो २०१६ स्पध्रेचे यजमान फ्रान्सला मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत कॅमेरूनवर ३-२ असा निसटता विजय मिळवून दिला. आक्रमक मध्यरक्षकाने निर्धारित वेळेच्या अगदी शेवटच्या क्षणाला मारलेल्या फ्री किकने कॅमेरूनचा गोलरक्षक फॅब्रिस ओंडोआला हुलकावणी दिली आणि फ्रान्सचा विजय निश्चित झाला.

ब्लेस मॅटुइडीने २०व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने आघाडी घेतली, परंतु कॅमेरूनने दोन मिनिटांतच बरोबरी साधली. २२व्या मिनिटाला व्हिन्सेंट अ‍ॅबौबेकरने कॅमेरूनसाठी गोल केला. ऑलिव्हर गिरॉडने पहिले सत्र संपायला चार मिनिटे शिल्लक असताना फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात अखेरच्या तीन मिनिटांत चुरस पाहायला मिळाली. ८८व्या मिनिटाला एरिक चॉपो मोटिंगच्या गोलने कॅमेरूनला दिलासा दिला, परंतु दोनच मिनिटांत त्यांच्या आनंदावर पॅयेटने पाणी फेरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:32 am

Web Title: france win in euro 2016
Next Stories
1 आयसीसी गोलंदाजांच्या यादीत अँडरसन अव्वल
2 महाराष्ट्राला दुहेरी अजिंक्यपद
3 ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करीन – खत्री
Just Now!
X