News Flash

फ्रान्सचे दिदिएर देशॉ यांना FIFAचा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार

FIFA World Cup 2018 मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले होते.

FIFA World Cup 2018 मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यांनी क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. फ्रान्सकडून पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल करण्यात आले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. या स्पर्धेसाठी फ्रान्सचे प्रशिक्षक असलेल्या दिदिएर देशॉ यांना FIFAचा यंदाचा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.

फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. फ्रान्सने अंतिम सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले. या विजेतेपदामुळे त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला. संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले होते. १९९८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत देशॉ हे फ्रान्सच्या संघात होते. तर आज झालेल्या सामन्यात ते फ्रान्सचे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. यापूर्वी ब्राझिलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रांज बेकनबॉयर यांनीही अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

दरम्यान, अंतिम सामन्यात १८व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आत्मघातकी गोल झाला. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. नंतर ३८व्या मिनिटाला अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पोगबाने ५९व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला एमबापेने गोल करत फ्रान्सला ४-२ ने आघाडीवर नेले. सामन्यात मॅन्झुकिच याने ६९व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला थोडा दिलासा दिला. मात्र फ्रान्सने सामना संपेपर्यंत क्रोएशियाला त्यापुढे जाऊ दिले नाही. अखेर रेफरीची शिट्टी वाजली आणि फ्रान्सने सामना ४-२ने जिंकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2018 1:16 am

Web Title: frances world cup winning coach didier deschamps wins fifa award for best mens coach of the year
टॅग : Fifa
Next Stories
1 Asia Cup 2018 : धवनला बसवा आणि राहुलला खेळवा – संजय मांजरेकर
2 BLOG: भारतीय क्रिकेटला वेग देणाऱ्या टी-२० विश्वचषक विजयाची ११ वर्षे आणि धोनी
3 भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस – सर्फराज अहमदची कबुली
Just Now!
X