27 February 2021

News Flash

VIDEO: दिग्गज फूटबॉलपटू झिदान मुंबईत!, चाहत्यांकडून जंगी स्वागत

स्वागतासाठी फूटबॉल प्रेमींनी मुंबई विमानतळावर तुफान गर्दी

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात कनाकिया बिल्डर्स उभारत असलेल्या कनाकिया पॅरिस या प्रोजेक्टच्या जाहिरातीसाठी झिदान यांच्याशी करार करण्यात आला आहे.

फ्रांसचा दिग्गज फूटबॉलपटू झिनेदीन झिदान मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी फूटबॉल प्रेमींनी मुंबई विमानतळावर तुफान गर्दी केली होती. झिदान हे सध्या रिअल माद्रिद संघाचे प्रशिक्षक असून, एका रिअल इस्टेट ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात कनाकिया बिल्डर्स उभारत असलेल्या कनाकिया पॅरिस या प्रोजेक्टच्या जाहिरातीसाठी झिदान यांच्याशी करार करण्यात आला आहे. या प्रोजेक्टच्या उदघाटनाला झिदान उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, मुंबई विमानतळावर झिदान यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. झिदानचे टी-शर्ट आणि त्यांच्या नावाचा जयघोष विमानतळावर सुरू होता. विमानतळावर उपस्थित प्रत्येक चाहता त्यांना भेटण्याचा, त्यांना पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न करत होता. चाहत्यांना आवर घालताना पोलिसांची दमछाक झाली होती.

व्हिडिओ-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 6:06 pm

Web Title: french football legend zinedine zidane arrives at mumbai airport
Next Stories
1 सर्वाधिक कमाई करणाऱया पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये एकही भारतीय नाही!
2 सायनाची विजयी सलामी
3 भारताच्या प्रशिक्षकपदासाठी प्रसादही रिंगणात
Just Now!
X