28 February 2020

News Flash

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, क्विटोवा यांची आगेकूच

जोकोव्हिच याने जेमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४  अशी मात केली.

| May 31, 2018 03:48 am

हॅलेप, डेलपोत्रो यांची विजयी सलामी

पॅरिस : विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले नोवाक जोकोव्हिच व पेत्रा क्विटोवा यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल करताना फारशी अडचण आली नाही. दरम्यान, पहिल्या फेरीतील लढतींमध्ये सिमोना हॅलेप व जुआन मार्टिन डेलपोत्रो यांनीही विजयी वाटचाल सुरू केली.

जोकोव्हिच याने जेमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४  अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये मुनार याने चांगली लढत दिली. तथापि, टायब्रेकरमध्ये जोकोव्हिच याने पासिंग शॉट्सच्या बहारदार खेळाबरोबरच बॅकहँडच्या फटक्यांचाही सुरेख खेळ केला.

डेलपोत्रोने पहिल्या फेरीत फ्रान्सचा जिगरबाज खेळाडू निकोलस मॅहूट याला १-६, ६-१, ६-२, ६-४ असे हरविले. त्याच्या वेगवान खेळापुढे निकोलसचा बचाव निष्फळ ठरला. एलिस येमेर याने डुडी सेला या अनुभवी खेळाडूला ७-६ (७-३), ६-३, ६-१ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली. पाच सेट्सपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत इस्तोनियाच्या जुर्गेन झॉप याने अमेरिकन खेळाडू जॅक सॉक याच्यावर ६-७ (४-७), ६-२, ४-६, ७-६ (७-५), ६-३ असा रोमहर्षक विजय मिळविला.

महिलांच्या दुसऱ्या फेरीत क्विटोवा हिने लारा अ‍ॅरुबरेन्का हिचा ६-०, ६-४ असा दणदणीत पराभव केला. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. तिने झरिना दियास हिचा ६-४, ७-५ असा पराभव केला. हॅलेप हिने अ‍ॅलिसन रिस्के हिच्यावर २-६, ६-१, ६-१ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. अँजेलिक कर्बर हिनेदेखील आव्हान टिकविताना मोना बार्थेल हिचा ६-२, ६-३ असा पराभव केला. ज्युलिया जॉर्जेस हिने डॉमिनिका सिबुलकोवा हिच्यावर ६-४, ५-७, ६-० असा विजय मिळविला.

First Published on May 31, 2018 3:48 am

Web Title: french open 2018 novak djokovic petra kvitova qualifier to reach third round
Next Stories
1 विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : सलाहच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम
2 लिलावातील बोलीच्या रकमेने भाच्यांच्या शिक्षणाला मदत होईल, प्रो-कबड्डीत महागडा खेळाडू ठरलेल्या दिपक हुडाची प्रांजळ कबुली
3 सुवर्णपदक विजेता भारतीय थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त
Just Now!
X