नदाल, जोकोव्हिचची विजयी घोडदौड

पॅरिस : अग्रमानांकित सिमोना हॅलेप आणि जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पोलंडची युवा खेळाडू इगा स्वियाटेक हिने हॅलेपचे आव्हान परतवून लावत कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पेनचा दुसऱ्या मानांकित राफेल नदाल आणि अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली.

गेल्या वर्षी चौथ्या फेरीतच स्वियाटेकला हॅलेपकडून पराभूत व्हावे लागले होते. पण स्वियाटेकने यावेळी बाजी पलवटत ६-१, ६-२ असा सहज विजय मिळवला. स्वियाटेकने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत हॅलेपला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. इटलीच्या यानिक सिन्नेर याने झ्वेरेव्हला ६-३, ६-३, ४-६,

६-३ असे हरवत उपांत्यपूर्व फे रीत मजल मारली. अंतिम आठ जणांमध्ये स्थान मिळवणारा तो २००६नंतरचा सर्वात युवा टेनिसपटू ठरला. सिन्नेरला आता उपांत्यपूर्व फे रीत नदालचा सामना करावा लागेल.

नदालने चौथ्या फेरीत अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डाचा ६-१, ६-१, ६-२ असा सहज धुव्वा उडवला. सर्बियाच्या जोकोव्हिचने कोलंबियाच्या डॅनियल गलान याला ६-०, ६-३, ६-२ अशी धूळ चारत चौथ्या फेरीत प्रवेश केला. आता जोकोव्हिचला रशियाच्या करेन खाचानोव्हशी लढत द्यावी लागेल.

नेदरलँड्सच्या पाचव्या मानांकित किकी बेर्टेन्सला रविवारी चौथ्या फेरीत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनकडून ६-४, ६-४ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत १५९व्या क्रमांकावर असलेल्या ट्रेव्हिसनला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी स्वियाटेकशी सामना करावा लागेल.

महिलांमध्ये, चेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित पेट्रो क्विटोव्हाने कॅनडाच्या लेयलाह अ‍ॅनी फर्नाडेझ हिच्याविरुद्ध ७-५, ६-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्स हिने स्पेनच्या ११व्या मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला ७-५, २-६, ६-४ असे हरवत चौथी फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित एलिना स्वितोलिनाने फ्रान्सच्या कॅ रोलिन गार्सिला हिला

६-१, ६-३ असे नमवत तिसऱ्यांदा फ्रे ंच स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

* वेळ : दुपारी २.३० पासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

आणि एचडी वाहिन्या.