19 November 2019

News Flash

French Open Badminton : सिंधूचा सहज विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

जपानच्या सयाका सातो हिच्यावर केली मात

French Open Badminton : पॅरिस येथे सुरु असलेल्या French Open Badminton स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सहज विजय मिळवला. तिने या सामन्यात जपानच्या सयाका सातो हिला २१-१७, २१-१६ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले आणि स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूने सुरुवातीपासूच सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते. पहिल्या गेमच्या शेवटच्या काही मिनिटात सातो हिने चांगले कमबॅक करत निकराची झुंज दिली. पण सिंधूने आपल्या अचूक फटाक्यांच्या जोरावर पहिला गेम २१-१७ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सामना अटीतटीचा झाला. पण हा गेमही २१-१६ असा खिशात घालत सिंधूने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या आधी, भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायनाने महिला एकेरीच्या गटात जपानची माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिला १०-२१, २१-१४, २१-१७ असे पराभूत केले. तर श्रीकांतनेही पुरुष एकेरीच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या डोंग कियुनचा १२-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला.

First Published on October 26, 2018 4:08 pm

Web Title: french open badminton pv sindhu enters quarter finals
टॅग Pv Sindhu
Just Now!
X