28 October 2020

News Flash

फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा : प्रज्ञेशची आगेकूच; नागल पराभूत

संघर्षपूर्ण लढतीनंतर सुमित नागलचे आव्हान संपुष्टात

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीची दुसरी फेरी गाठली आहे. मात्र संघर्षपूर्ण लढतीनंतर सुमित नागलचे आव्हान संपुष्टात आले आहे.

भारतीय टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील प्रज्ञेशने तुर्कीच्या केम इलकेलचा ६-३, ६-१ असा पराभव केला, तर १६व्या मानांकित नागलने जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनविरुद्ध हार पत्करली. ब्राऊनने ही लढत ७-६ (४), ७-५ अशी जिंकली. नागलने अमेरिकन टेनिस स्पर्धेत सलामीची लढत जिंकत लक्ष वेधले होते.

पाच जणांची माघार

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फे रीतून पाच जणांना माघार घ्यावी लागली आहे. दोन टेनिसपटूंना करोना विषाणू संसर्गाची लागण झाल्यामुळे आणि तीन टेनिसपटूंना करोनाबाधित प्रशिक्षकाच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरण पत्करावे लागणार आहे. येत्या २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत हे पाचही जण सहभागी होणार नाहीत, असे संयोजकांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:02 am

Web Title: french open qualifying tennis tournament prajnesh advance abn 97
Next Stories
1 कर्णधाराची हांजी-हांजी न केल्याने रायुडूला भारतीय संघात जागा नाही – अजय जाडेजा
2 विश्वचषक संघात रायुडूला स्थान न मिळणं हा भारताचाच तोटा – शेन वॉटसन
3 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : मँचेस्टर युनायटेड सलामीलाच पराभूत
Just Now!
X